यशवंत हॉस्पिटलमध्ये 24 तास आपत्कालीन सेवा उपलब्ध असते. आपत्कालीन विभागामार्फत अत्यवस्थ आणि गंभीर रुग्णांना आवश्यक ते उपचार दिले जातात. आमच्या हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर कर्मचारी हे अशा आपत्कालीन आणि गंभीर रुग्णांना अत्यंत कुशलतेने हाताळू शकतात. हृदयविकाराचा झटका, श्वास घेण्यास असमर्थ असणारे रुग्ण, गंभीर दुखापत आणि इतर गंभीर अवस्थेतील रुग्णांना परिपूर्ण उपचार देण्यास आमच्याकडे प्रगत तंत्रज्ञान आणि लाईफ सपोर्ट सिस्टीम उपलब्ध आहे.