यशवंत हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक विभागात हाडांना व स्नायूंना झालेल्या गंभीर दुखापतीवर परिपूर्ण उपचार केले जातात. सांधे प्रत्यारोपण, आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, खेळताना झालेली इजा, व्यंगोपचार आणि इतर हाडासंबंधीच्या आजारावर उपचार करण्यासाठी आमच्याकडे कुशल अस्थिरोग तज्ज्ञ आणि शल्यचिकित्सकांची टीम उपलब्ध आहे. आम्ही अद्ययावत तंत्र आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने रुग्णांना पूर्ववत हालचाल करता यावी, त्यांच्या वेदना कमी व्हाव्यात आणि त्यांना निरोगी जीवन प्राप्त व्हावे म्हणून प्रयत्न करतो.