मेंदू, मणका आणि नसांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या जटील समस्यांचे अचूक निदान, प्रभावी उपचार आणि उपचारानंतरचे व्यवस्थापन करण्यावर न्यूरोसर्जरी विभागाचा जास्त भर असतो. प्रख्यात डॉ. अनिल विष्णू पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम मेंदू शस्त्रक्रिया, मणका शस्त्रक्रिया आणि कमीतकमी चिरफाड करून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया या सगळ्यात पारंगत आहे. रुग्णांना पूर्ववत निरोगी जीवन जगता यावे यासाठी अद्ययावत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा आम्ही पुरेपूर वापर करतो. रुग्णांना पुन्हा पूर्ववत निरोगी जीवन प्राप्त व्हावे यासाठी न्यूरोसर्जिकल विभागाच्या माध्यमातून आम्ही अतिशय प्रामाणिकतेने प्रयत्न करतो.